Chetan Zadpe
आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मनगटावर मोठ्या रुद्राक्षांची माळ बांधली होती. या रुद्राक्षाच्या माळेने सर्वांच लक्ष वेधले.
या रुद्राक्षांच्या माळा परिधान करुन त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचा आरोप केला होता.
या रुद्राक्षांच्या माळेने त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष संदेश दिला की, 'हिंदुत्त्व हा आमचा मुद्दा आहे आणि याचमार्गावर पक्षाची वाटचाल असेल.
भाषण करताना उद्धव ठाकरे देखिल कुर्ता, पायजमा, घालून येतात. आता त्यांनी रुद्राक्षांच्या माळेचा समावेश करुन आपणच बाळासाहेबांच्या वारसा जपत आहोत, असे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले.
उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील आणि हातातील रूद्राक्षांच्या माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हातात आयुष्यभर रूद्राक्षाची माळ कायम जपली.
22 जानेवारी रोजी ठाकरे कुटुंबियांनी काळाराम मंदिरात महापूजा केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची भगवी वस्त्रे आणि रुद्राक्षांच्या माळांची चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आणि नेत्यांसह नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात रुद्राक्षची माळ बांधली. ती माळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.