महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘लेडी पॉवर’; कोण आहेत चर्चेतल्या नेत्या?

Mangesh Mahale

गल्ली ते दिल्ली

महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत महिला नेत्या प्रभावी भूमिका बजावताना दिसतात. अशा काही महिला नेत्या विषयी जाणून घेऊया

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी महिला नेत्या म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले जाते. संसदेतील अभ्यासू वक्त्या, संयमी शैली, मजबूत संपर्क आणि सक्रिय दौरे यामुळे त्यांचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसतो.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

सुनेत्रा पवार

बारामती लोकसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार या अधिक चर्चेत आल्या. उपमुख्यमंत्री म्हणून सध्या त्या कार्यरत आहे. राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

पंकजा मुंडे

भाजपच्या ओबीसी चेहऱ्यांमध्ये पंकजा मुंडे यांचे नाव महत्त्वाचे मानले जाते. बीड आणि मराठवाड्यात त्यांचा मोठा जनाधार आहे. सोशल मीडियावरही त्या सक्रिय आहेत.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

यशोमती ठाकूर

विदर्भातील काँग्रेसचा प्रभावी महिला चेहरा म्हणून ओळखल्या जातात. विधानसभेतील आक्रमक भाषणशैली आणि शेतकरी प्रश्नांवरील भूमिका यामुळे त्या चर्चेत असतात.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

रोहिणी खडसे

उत्तर महाराष्ट्रातील युवा महिला नेत्या म्हणून रोहिणी खडसे यांची ओळख आहे. सोशल मीडिया आणि युवकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढताना दिसतो.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

प्रणिती शिंदे

सोलापूरमधून खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांची राज्यभरात चर्चा वाढली. युवा मतदार आणि महिला वर्गात त्यांची प्रतिमा सकारात्मक मानली जाते.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

चित्रा वाघ

भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून चित्रा वाघ कायम चर्चेत असतात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर त्या भूमिका घेताना दिसतात.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

आदिती तटकरे

कोकणातील युवा नेतृत्व म्हणून आदिती तटकरे यांचे नाव पुढे येत आहे. प्रशासनातील कामकाज आणि विकासकामांवर त्यांचा भर असल्याचे दिसते.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

वर्षा गायकवाड

मुंबईतील काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा म्हणून वर्षा गायकवाड यांची ओळख आहे. शिक्षण आणि शहरी प्रश्नांवर त्या सक्रिय असतात.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

सुषमा अंधारे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख आहे. जाहीर सभा, भाषणशैली आणि सत्ताधाऱ्यांवर थेट टीका यामुळे त्या कायम चर्चेत असतात.

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics | Sarkarnama

NEXT: ईडीच्या रडारवर आलेले महाराष्ट्रातील ‘बडे’ नेते कोणते?

येथे क्लिक करा