सरकारनामा ब्यूरो
सरकार विविध योजना तयार करत असते. त्या योजना विशिष्ट मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
जगभरातील काही सरकारांमध्ये जी मंत्रालय आहेत त्यांनी नावे आणि त्यांच्या मंत्र्यांना पडलेली नावे वाचून तुम्हाला हसू येईल. तर, काही नावे वाचून आश्चर्याचा धक्काही बसेल.
जपानमधील महिला सक्षमीकरण मंत्री हारुको अरिमुरा यांनी 2014 मध्ये त्यांच्या नाव सोबत शौचालय मंत्री असे नाव जोडले.
आपल्या नावासोबत शौचालय मंत्री नाव जोडणाऱ्या हारुको अरिमुरा यांच्या आणि जपान सरकारच्या मते महिलांच्या प्रगतीसाठी सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवणे आवश्यक आहेत.
भारत देशात 2014 मध्ये केंद्ररकारने योग मंत्रालयाची स्थापना केली आहे. यालाच आयुष मंत्रालय म्हणूनही ओळखले जाते.
गेल्या 3 वर्षापासून रशिया मध्ये युद्ध चालू असल्याने तेथील लोकसंख्याचा दर कमी झाला आहे. यामुळे पुतीन सरकारने लोकसंख्या वाढवण्यासाठी 'सेक्स मिनिस्ट्री'ची स्थापना करण्याची योजना बनवली आहे.
अमेरिकेमध्ये लोकांचे जीवन खुश आणि सुखी ठेवण्यासाठी USA सरकारने फेब्रुवारी 2016 मध्ये मिनिस्ट्री ऑफ हॅप्पीनेसची स्थापना केली आहे.
अमेरिकेमध्ये अनेक वर्षापासून 'बोर्ड ऑफ टी एक्सपर्ट' काम करत आहे. जे दुसऱ्या देशातून येणाऱ्या चहाची चव आणि गुणवत्ता तपासण्याचे काम करते.