MP Disqualification : खासदार फुटले तर अपात्र ठरणार! पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो?

Roshan More

टीएमसीत बंड

टीएमसीच्या २० खासदार फक्त नवीन गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात विलीन झाले आहेत. त्यामुळे ते अपात्र ठरणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

TMC | Sarkarnama

अपात्रतेचा धोका

नवीन पक्षात बंडखोर खासदार विलीन झाले असले तरी त्यांना पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्रतेचा धोका असू शकतो.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

कायदा

भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूची (Tenth Schedule) नुसार एखादा खासदार किंवा आमदार यांच्या अपात्रतेविषयी तरतूद आहे.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

...तर अपात्र ठरणार

स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडतो, पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात वागतो तो सदस्य अपात्र ठरू शकतो.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

ते संरक्षण काढले

पूर्वी 1/3 सदस्य फुटले तर संरक्षण मिळत असे. मात्र 91 व्या घटनादुरुस्तीने (2003) हे संरक्षण काढून टाकण्यात आले. आता फक्त "विलिनीकरण" (Merger) ला संरक्षण आहे.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

विलिनीकरणासाठी अट काय?

दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 नुसार मूळ राजकीय पक्षाने (Original Political Party) दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला पाहिजे. विधिमंडळ पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी त्या विलिनीकरणाला मान्यता दिली पाहिजे.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

त्या सदस्यांना धोका

टीएमसीचे 29 खासदार आहेत. त्यापैकी 20 खासदार बाहेर पडले.त्यांनी "नवा गट" स्थापन केला. नंतर तो गट दुसऱ्या पक्षात विलीन केला.मात्र, मूळ पक्षाच्या आदेशाने ते विलीकरणन झाले नाही. त्यामुळे ते अपात्र ठरण्याचा धोका आहे.

MP Disqualification Anti-Defection Law | sarkarnama

NEXT : केंद्रात 8 वर्षे मंत्री, सत्ता जाताच काँग्रेसला सोडचिठ्ठी; आता 'या' नेत्याची वाताहत...

Congress | Sarkarnama
येथे क्लिक करा