Sudesh Mitkar
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महिलांमध्ये असलेली लोकप्रियता, त्यामुळेच मध्य प्रदेशात पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. दुसरे कारण म्हणजे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे राज्यातील सर्वात मोठे ओबीसी चेहरा आहेत.
भाजपने ओबीसी चेहऱ्याला नवा मुख्यमंत्री बनवण्याची रणनीती आखली तर मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे नाव पुढे येऊ शकते.
माळव्यातील दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असून या दरम्यान त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली.
भाजपला सत्तेत आणण्यात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. याच कारणामुळे पक्ष मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदही एका महिला आमदाराकडे सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर रीति पाठक हे नाव पुढे असेल.
सध्याचे मुख्यमंत्री शिवराज यांच्याशिवाय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.
निवडणुकीपूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार मानले जात होते, मात्र त्यांच्या मुलाशी संबंधित कथित वादग्रस्त व्हिडिओमुळे त्यांच्या उमेदवारीला चांगलाच धक्का बसला आहे.
भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे, त्यात व्हीडी शर्मा यांची भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे, कारण व्हीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटनेने मोठा विजय मिळवला आहे.