Roshan More
खासदार फंड खर्च करण्यात महाराष्ट्रातील बहुतांश खासदार नापास झाले आहेत.
उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड निधी खर्च करण्यात ५७ टक्के खर्चासह अव्वल स्थानी आहेत.त्यांना १४.७० कोटी मंजूर झाले होते, त्यापैकी त्यांनी ५६.१ टक्के निधी प्रत्यक्ष खर्च केला आहे.
निधी खर्च करणाऱ्या पहिल्या ५ खासदारांमध्ये वर्षा गायकवाड, बळवंत वानखेडे आणि संदिपान भुमरे यांचा समावेश आहे.
प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी शासनाकडून वार्षिक ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो.
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या या कालावधीत राज्यातील प्रत्येक खासदाराला सरासरी १४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.राज्याला खासदार फंडाच्या माध्यमातून एकूण ७१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
बहुतांश खासदारांच्या निधी खर्चाची टक्केवारी अवघी १० ते १५ टक्क्यांच्या आतबाहेर असल्याचे समोर आले आहे.काही खासदारांचा खर्च तर अगदी शून्य ते एक-दोन टक्क्यांवरच मर्यादित राहिला आहे.
नंदुरबारचे गोवाल पाडवी यांनी मंजूर १४.८० कोटींपैकी शून्य टक्के निधी वापरून सर्वात कमी खर्च केला आहे. तसेच कल्याणचे श्रीकांत शिंदे (०.२%) आणि बुलढाण्याचे प्रतापराव जाधव (०.८%) हे देखील सर्वात मागे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात मावळचे श्रीरंग बारणे २१ टक्के खर्चासह आणि कोल्हापूरचे शाहू महाराज २० टक्के खर्चासह पुढे आहेत.तर प्रणीती शिंदे (२.४%), सुप्रिया सुळे (८.६%) आणि मुरलीधर मोहोळ (८.२%) यांचा खर्च बराच कमी आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! 'या' योजनेत बोगसगिरी केल्यास 5 वर्षांसाठी सरकारी मदत बंद होणार...