Rashmi Mane
हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हनुमान गढी येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारसेवकांचा सत्कार आणि 11 लाख लाडू वाटप तसेच दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक हनुमान चालिसा पठणाने झाली.
11 लाख लाडवांचे वाटप यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हनुमान गढीमध्ये उभारण्यात येणाऱ्या 111 फूट विशाल हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, चंद्रकुमार जाजोदिया, राजेश मोरडिया, अधिवक्ता वासुदेव नवलानी आदी मान्यवर उपस्थित होते.