Rashmi Mane
राजकारणाचा व्याप सांभाळून स्वतःच्या फिटनेससाठी वेळ काढणे सहसा राजकीय लोकांना जमत नाही. पण आजकाल राजकारणातही फिटनेसची क्रेझ आली आहे.
राजकारणी म्हणलं की सततचे दौरे आणि लोकांच्या गराड्यात सतत व्यस्त असणारी नेतेमंडळी. राजकारणाचा व्यस्त असतांना स्वतःच्या फिटनेससाठी वेळ तसं कठीणचं.
फिटनेसच्या बाबतीत सर्वाधिक फिट नेत्यांमध्ये धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा क्रमांक अगदी वरचा आहे.
ओमराजे राजकारणाचा व्यापातून दररोज सकाळी दोन तास स्वतःसाठी वेळ काढतात.
नियमित योगासने, धावणे आणि जिममधील वर्कआऊट सोबतच मॅरॅथॉनमध्ये धावतांना दिसतात.
व्यायामासोबतच आहारावर ते विशेष लक्ष देतात. दिवसातून दोनवेळा जेवण आणि इतर वेळी अधिकाधिक प्रोटीन युक्त आहार कसा मिळेल याचा प्रयत्न करतात.
ओमराजे म्हणतात मला कॉलेजच्या जीवनापासूनच व्यायामाची खूप आवड आहे. दिवसाच्या २४ तासांतील दोन तास केवळ आणि केवळ स्वतःसाठी काढायचा हा माझा नित्यनियम आहे.
त्यामुळे धाराशिव असो, मुंबई, दिल्ली वा ज्या ठिकाणी मला मुक्काम करावा लागतो; त्याठिकाणी सर्वांत आधी मी चांगल्या जिमचा शोध घेतो. दिवसभरात कितीही काम असले तरी, मी आवर्जून दोन तास व्यायामासाठी देतोच देतो.