Roshan More
संसदेत सिंदूर ऑपरेशनवर चर्चा झाली. या चर्चेत टीएमसीच्या खासदार सायोनी घोष यांच्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली.
सायोनी यांचे संसदेतील भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
सायोनी या पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आहेत. मात्र, 2021 मध्ये त्यांची ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्यावर जून 2021 मध्ये तृणमूलच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवार अग्निमित्रा पॅाल यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
पराभवानंतर देखील त्या पक्षात सक्रीय होत्या. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती.
सायानी घोष यांना तृणमूल काँग्रेसने 2024 लोकसभा निवडणुकीत टिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी जादवपूर मतदारसंघातून त्यांनी अडीच लाख मतांनी विजय मिळवला.