Amol Sutar
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा आज 83वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 फेब्रुवारी 1941झाला आहे. लोकसभेतील कणखर आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
खासदार पाटील आणखी एका गोष्टीमुळे राज्यातच नाही तर देशात ओळखले जातात. ती राष्ट्रवादीच्या शरद पवारांचा राजकारणातील सच्चा 'दोस्त'
शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची गेली 60 वर्षांची दोस्ती. राजकारणात अनेक चढउतार झाले. कोणी कोणाला सोडून गेले. मात्र या दोघांची दोस्ती अभेद्य राहिली.
2019 च्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीची साताऱ्यातील सांगता सभा भर पावसात झाली. यावेळी शरद पवार यांनी छत्री नाकारली अन् भाषण सुरू असताना श्रीनिवास पाटील त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले.
जिल्ह्याचे प्रश्न लोकसभेत मोठ्या पोटतिडकीने मांडणारा आणि ते निकालात काढणारा खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची सभागृहातील अनेक भाषणे गाजली.
त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनाही तातडीने उपाययोजना कराव्या लागत. ते जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी मित्रत्वाचे नाते आहे.
सामान्यांशी नाळ जोडलेला खासदार म्हणून त्यांची सातारा लोकसभा मतदारसंघात ओळख आहे. जनतेचे तात्काळ प्रश्न सोडवून त्यांनी अनेक कामे मार्गी लावली.
शरद पवारांना पक्षातील अनेक नेते सोडून गेले. पण या संघर्षात त्यांचा एक मित्रही आजही त्यांच्यासोबत सह्याद्रीसारखा उभा असल्याचे पाहायला मिळाले ते म्हणजे खासदार पाटील.