Mangesh Mahale
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू युगेंद्र श्रीनिवास पवार यांचा विवाह नुकताच मुंबईत पार पडला.
मुंबईच्या तनिष्का कुलकर्णी यांच्याशी युगेंद्र पवार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार, प्रफुल्ल पटेल आदी या विवाहास उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी लग्नाच्या कार्यक्रमात तुफान डान्स केला, ज्यामुळे सोहळ्याची रंगत वाढली, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या सोहळ्यात युगेंद्र यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उत्स्फूर्त सहभाग सगळ्याचे लक्ष वेधून गेला.
अजित पवार प्रचारात व्यग्र असल्याचे ते गैरहजर होते, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवार आदी पवार कुटुंबिय उपस्थित होते.
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं या ऐतिहासिक वाक्याचा दाखला देत माझ्याही घरात आज लग्न आहे, पण मी प्रचारात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार सोहळ्यास उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सोहळ्यास हजेरी लावली.