Jagdish Patil
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटत आहेत.
टेरिफमुळे आशियाई देशांमध्ये शेअर बाजार कोसळला, याचा परिणाम भारतावर देखील मोठ्या प्रमाणावर झाला.
टेरिफ म्हणजे परदेशातून आयात केलेल्या किंवा आपल्या देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर सरकारद्वारे आकारला जाणारं शुल्क.
ज्यावेळी 2 देशांत आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. त्यावेळी वस्तू आणि सेवा राष्ट्रीय सीमा ओलांडतात. त्यामुळे त्यावर अनेक कर लादतात त्याला एकत्रितपणे करांना टेरिफ म्हणतात.
परदेशातून देशात येणाऱ्या मालावर जो कर आकारतात त्याला आयात शुल्क, तर आपल्या देशातून परदेशात जाणाऱ्या मालावर जो कर आकारला जातो त्याला निर्यात शुल्क म्हणतात.
देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आणि परदेशी स्पर्धेपासून आपल्या उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी टेरिफचा वापर केला जातो.
टेरिफच्या माध्यमातून सरकार महसूल गोळा करते. तसंच टेरिफचा वापर व्यापाराचे नियमन करण्यासाठीही केला जातो.
टेरिफमुळे आयात केलेल्या मालाची किंमत वाढते. त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात.
टॅरिफमुळे दोन देशांमधील संबंध बिघडून व्यापार युद्ध देखील निर्माण होऊ शकते. जे सध्या अमेरिका आणि चीनमध्ये पाहायला मिळत आहे.