Sachin Waghmare
देशात गेल्या 50 वर्षात झालं नाहीत तेवढी विकासकामे 10 वर्षात झाली, असे मुख्यमंत्री शिंदें म्हणाले.
लोकसभेची ही निवडणूक व्यक्तिगत नाही, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनीं महायुतीच्या पाठीशी उभे राहावे.
या निवडणुकीत देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि विकास डोळ्यासमोर ठेवून लढवतोय.
अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदी यांनी 11 व्या वरून 5 व्या क्रमांकावर आणली आहे. आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
आपली लढाई ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. गेल्या काही दिवसापासून मी विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे.
आधीच सरकार हे घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते.
काँग्रेसला जाहीरनामा जाहीर करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनाफा दिला पाहिजे.
मी पहाटेपर्यंत काम करतो. माझ्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 तास काम करतात, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काँग्रेसने देशाला खड्यात घातले आहे. म्हणून मोदी सरकार एक गॅरेंटी आहे.