नगरसेवकपद रद्द होताच ज्यांच्यासाठी ठाकरे मैदानात; 'त्या' विशाखा राऊत कोण?

Jagdish Patil

विशाखा राऊत

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.

Vishakha Raut | sarkarnama

कारवाई

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

Vishakha Raut | sarkarnama

आदित्य ठाकरे

या कारवाईनंतर "विशाखाताईंसाठी न्यायालयीन लढाई लढू", असं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Aaditya Thackeray | sarkarnama

माहिती

याच सर्व पार्श्वभूमीवर विशाखा राऊत कोण आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Vishakha Raut | sarkarnama

माजी महापौर

राऊत या मुंबईच्या माजी महापौर, आमदार आणि अनेक वर्षे मुंबई महापालिकेतील प्रवाभी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.

Vishakha Raut

शिवाजी पार्क

दादर-शिवाजी पार्क परिसरातील शिवसेनेच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाचं काम केलं आहे.

Vishakha Raut | sarkarnama

नगरसेविका

1997 साली त्या BMC नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि 1997-98 साली त्यांची महापौरपदी निवड झाली.

Vishakha Raut

आमदार

1999 ते 2004 या काळात त्या दादर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या.

Vishakha Raut

जबाबदारी

तर 2018 मध्ये मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Vishakha Raut | Sarkarnama

धक्का

विशाखा राऊत या ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचं पद रद्द होणं हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय.

Vishakha Raut | Sarkarnama

NEXT : तुकाराम मुंढेंसारखीच धडाकेबाज महिला IAS, वर्षभरात चार वेळा बदली! नेहा मारव्या सिंह कोण?

IAS Neha Marvya Singh | sarkarnama