सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे बदल केले आहेत.
आतापर्यंत उत्तरपत्रिकेत उत्तरासाठी चार पर्याय दिले जात होते, मात्र इथून पुढे 'पाचवा' पर्याय समाविष्ट करण्यात येणार आहे.
आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी केली जाणार आहे.
उमेदवाराला एखादा प्रश्न सोडवायचा नसेल, तर त्याला 'पाचवा' पर्याय छायांकित (रंगवणे) करणे अनिवार्य असेल.
जर पाचपैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर नकारात्मक गुण पद्धतीनुसार त्या प्रश्नासाठी 25% किंवा 1/4 गुण वजा केले जातील.
उमेदवारांचा बैठक क्रमांक आता 8 अक्षरांऐवजी 7 अंकी असेल आणि तो संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायम राहील.
निश्चित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, काळा बॉल पेन व्यतिरिक्त इतर पेन वापरल्यास तसेच उत्तरपत्रिकेवर कोठेही इतर अनावश्यक मजकूर किंवा चिन्ह केल्यास किंवा क्यूआर कोड खराब केल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरेल.
विद्यार्थ्यांची मुख्य चिंता गट 'ब' आणि 'क' परीक्षांसाठी 1 तासात 100 प्रश्न सोडवणे अपेक्षित असते; अशावेळी न सोडवलेल्या प्रश्नांसाठी पाचवा पर्याय रंगवताना वेळ कमी पडण्याची भीती विद्यार्थ्यांना असणार आहे.