सरकारनामा ब्युरो
'MPSC'ची परीक्षाही आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर घेतली जाणार आहे.
UPSC मध्ये कधी पूर्व परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार, याचे कॅलेंडर निश्चित असते.
याप्रमाणे MPSC चीही कधी पूर्व परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार, याचे कॅलेंडर निश्चित करण्यात येणार आहे.
याशिवाय 2012 पूर्वीप्रमाणे मुख्य परीक्षा पुन्हा वर्णनात्मक तथा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्यात येणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यानंतर होणारी मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक असणार आहे.
MPSCचे वेळापत्रक अनियमित आहे. या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होते, अशी तक्रार आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली होती.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत ही महत्वपूर्ण घोषणा केली.
सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी अन्य राज्यांच्या लोकसेवा आयोगाचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासानुसार MPSC ला नवे स्वरूप दिले जाणार आहे.
भविष्यात आयोगातर्फे मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी राज्याला दिली.