Rashmi Mane
सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील उप वैद्यकीय अधीक्षक (गट-ब) पदाच्या २ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी MBBS पदवी, रुग्णालय प्रशासनातील पदव्युत्तर पदवी/पदविका आणि किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
भाषा संचालनालयातील सहायक भाषा संचालक (गट-ब) पदाच्या २ जागांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. मराठी विषयातील पदवी/पदव्युत्तर शिक्षणासह इंग्रजीचे ज्ञान आणि संबंधित भाषांतर किंवा शब्दावली निर्मितीचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता सुरू होईल. उमेदवारांना २९ सप्टेंबर २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २ ऑक्टोबर २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि आरक्षणाच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे.
भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता आणि इतर नियमांसाठी MPSC चे अधिकृत संकेतस्थळ पाहा. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.