Pune Metro: पुण्यात धावणार 6 डब्यांची मेट्रो; सर्वच मार्गांच्या कामासाठी ठरली डेडलाईन

Mangesh Mahale

नव्या ट्रेन

पुण्यात मेट्रोच्या डब्यांची संख्या तीनवरून सहापर्यंत वाढविण्यासाठी महामेट्रोने तयारी सुरू केली आहे. विस्तारित मार्गिकांसाठी दोन टप्प्यांत अनुक्रमे १२ व १५ ट्रेन नव्याने दाखल होणार आहेत.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

प्रकल्प

मेट्रोच्या डब्यांची संख्या तीनवरून सहापर्यंत वाढविण्यासाठी ‘अर्बन मास ट्रान्झिट कंपनी’कडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

डेडलाईन

मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांसह टप्पा-२ मधील सर्वच मार्गांची कामे २०३० अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

मसुदा

शिवाजीनगर येथील बस स्थानक उभारण्यासंदर्भात ‘महामेट्रो’ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) यांच्यातील कराराचा मसुदा अंतिम झाला आहे.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

एसटी स्थानक

शिवाजीनगर येथील एसटी स्थानकासाठी निविदा काढून त्याच्या पुढील कामाला गती देण्यात येणार आहे. येथे एसटी स्थानक व बस पार्किंग उभारले जाणार आहे. पीपीपी तत्त्वावर जागेचा विकास केला जाणार आहे.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

प्रवाशी संख्या

पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या आर्थिक वर्षात दोन्ही मार्गिकांवरून सात कोटी आठ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

उत्पन्न

तिकिटांतून ११२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.तिकिटांशिवायच्या इतर उत्पन्न स्रोतांद्वारे २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Pune Metro to Get Six Coaches | Sarkarnama

NEXT: फडणवीसांचे धडाकेबाज निर्णय: AI वर भर, IT कॅडर; काय बदलणार?

येथे क्लिक करा