Deepak Kulkarni
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण झालं आहे.
महायुती सरकारच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित अधिक वेगवान आणि सुरक्षितहोणार असल्याचा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 'मिसिंग लिंक'हा मोठा प्रोजेक्ट मार्गी लावल्यानंतर आता आणखी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.
एमआरडीसीकडून आजमितीला सहा पदरी असणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या मोठ्या निर्णयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सतत भेडसावणारा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा दहा पदरी करण्यासाठीचा हा भव्य प्रोजेक्टसाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे.
एमआरडीसीकडून द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असणारी 100 हेक्टर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहा पदरीकरणाचं जोरदार काम सुरू होणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील ट्रॅफिक कमी करण्याच्या उद्देशानं ‘मिसिंग लिंक’ नंतरचा एमआरडीसीचा दहा पदरी करणाचा प्रकल्प विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.