ई-बसचा प्रवास झाला स्वस्त; ‘एसटी’ने आणली धमाकेदार योजना, एकदा वाचाच...

Rajanand More

एसटीचा महत्वाचा निर्णय

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Pratap Sarnaik Fitness Funda | Sarkarnama

ताफ्यात किती बस?

ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढणार आहे.

MSRTC E Bus | Sarkarnama

पास योजना

राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना फायदा.

MSRTC E Bus | Sarkarnama

उपलब्धता

एसटीच्या 9 मीटर ई-बस, 12 मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. यातून ई-शिवनेरी बससेवा वगळली आहे.

MSRTC E Bus | Sarkarnama

मासिक पास

मासिक पास योजनेअंतर्गत 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 30 दिवसांसाठी पास दिला जाईल.

MSRTC E Bus | Sarkarnama

त्रैमासिक पास

या योजनेत 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 90 दिवसांचा पास उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त 30 दिवसांचा प्रवास मोफत करता येईल.

MSRTC E Bus | Sarkarnama

लवचिकता

उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील, असेही एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

MSRTC E Bus | Sarkarnama

फरक भाडे नियम

निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक 100% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

MSRTC E Bus | Sarkarnama

NEXT : महिला जिल्हाधिकाऱ्यांना दणका; सरकारी बंगल्यावर कब्जा करणे पडले महागात

येथे क्लिक करा.