MSRTC Bus : एसटीचा मोठा निर्णय; लालपरी मध्येच थांबली? आता टेन्शन नको! पुढचा प्रवास थेट 'शिवशाही' किंवा 'ई-शिवाई'ने

Rashmi Mane

प्रवाशांसाठी मोठा निर्णय

लालपरी रस्त्यात अचानक बंद पडली, तर आता प्रवाशांचा प्रवास थांबणार नाही. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

MSRTC Bus | Sarkarnama

विनाशुल्क पुढचा प्रवास!

लालपरी बंद पडल्यास मागून येणाऱ्या कोणत्याही एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे आणि त्यासाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही.

कोणत्या बसमध्ये प्रवेश?

साधी, निमआराम, वातानुकूलित, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी – कोणतीही एसटी बस असली तरी प्रवाशांना चढवणे आता बंधनकारक आहे.

यापूर्वी प्रवाशांची अडचण

याआधी साधी बस बंद पडली तर फक्त साध्याच बसमध्ये प्रवेश दिला जात असे. आता नियम बदलल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकही रुपया नाही!

बस प्रकार बदलला तरी भाडे फरक आकारता येणार नाही. विनाशुल्क आणि तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देणे हा प्रवाशांचा हक्क आहे.

प्रवेश नाकारला तर काय कराल?

प्रवाशांना बसमध्ये चढू दिले नाही, तर जवळच्या एसटी आगारात तक्रार नोंदवता येते. आगार प्रमुख किंवा नियंत्रक अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येतो.

काही ठिकाणी तक्रारी

शिवशाही व ई-शिवाई बसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, चंद्रपूर विभागात सध्या तक्रारी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहक-चालकांवर कारवाई

प्रवाशांकडून भाडे मागितले, प्रवेश नाकारला किंवा गैरवर्तन केले तर संबंधित वाहक व चालकांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

घाबरू नका!

प्रवासादरम्यान एसटी बंद पडल्यास शांत राहा आणि मागून येणाऱ्या बसमध्ये चढा. ही सुविधा तुमचा अधिकार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Next : अग्निवीर होणार 'परमनंट'! पण भारतीय लष्कराचे हे नवे मापदंड माहित आहेत का?

येथे क्लिक करा