Sunil Balasaheb Dhumal
मुहम्मद युनूस यांचा जन्म बांगलादेशातील चितगाव येथे 28 जून 1940 रोजी झाला.
ते एक प्रसिद्ध सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थशास्त्रज्ञ आणि नागरी समाजाचे नेते आहेत.
मुहम्मद युनूस यांना 2006 मध्ये गरीबांना आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या कल्पनांसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.
नोबेलसह युनूस यांना 2009 मध्ये युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम आणि 2010 मध्ये काँग्रेसनल गोल्ड मेडलसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
मुहम्मद युनूस यांनी 2011 मध्ये युनूस सोशल बिझनेस - ग्लोबल इनिशिएटिव्ह्सची स्थापना केली.
2012 ते 2018 पर्यंत, त्यांनी स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम केले आणि पूर्वी ते चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.
मुहम्मद युनूस यांनी ग्रामीण अमेरिका आणि ग्रामीण फाऊंडेशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यांनी 1998 ते 2021 या कालावधीत युनायटेड नेशन्स फाऊंडेशनचे बोर्ड सदस्य म्हणून काम केले आणि UN च्या विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले.
या वर्षाच्या जानेवारीत युनूस यांना कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगवास झाला होता. तसेच 2.3 दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळ्याप्रकरणी त्याला तुरुंगवासही झाला होता.
युनूस यांनी गरिबांसाठी केलेल्या कामांमुळे त्यांना 'बँकर टू द पुअर' असे म्हटले जाते.