Rajanand More
दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तमिलगा वेट्री कजगम या पक्षाचे ते प्रमुख असून नुकत्याच पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ते अडचणीत आले आहेत.
राजकारणात पाऊल टाकण्याआधी विजय हे सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. बॉलीवुडचे किंग खान शाहरूख खाननंतर विजय हे सर्वात महागडे अभिनेते आहेत.
फॉर्च्यून इंडियाच्या रिपोर्टनुसार देशात आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विजय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 80 कोटींचा कर भरला होता.
विजय यांच्याकडून एका चित्रपटासाठी तब्बल 130 ते 200 कोटी रुपये फी घेतली जाते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘G.O.A.T’ या चित्रपटासाठी त्यांनी 200 कोटी घेतल्याचे निर्मात्यानेच सांगितले होते.
सुपरस्टार विजय यांचा तमिळनाडूमध्ये समुद्रकिनारी राजवाड्यासारखा बंगला आहे. हॉलीवूड स्टार टॉम क्रूजच्या ‘बीच हाऊस’सारखा हा बंगला उभारण्यात आला आहे. हा आलिशान बंगला चेन्नईतील नीलांकरईमध्ये आहे.
विजय यांच्याकडे रोल्स रॉईस घोस्ट, बीएमडब्ल्यू एक्स 5–एक्स 6, ऑडी ए8 एल, रेंज रोव्हर ईवोक, फोर्ड मस्टँग, वोल्वो एक्ससी90 अशा लक्झरी गाड्या आहेत.
चित्रपटामध्ये अभिनयासाठी मिळणाऱ्या फी व्यतिरिक्त जागतिक उत्पादनांच्या जाहिराती, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, चित्रपट निर्मिती आदी माध्यमांतूनही विजय यांची मोठी कमाई होते.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, थलापती विजय यांची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटीच्या जवळपास आहे. चित्रपटांतून मिळणाऱ्या कमाईचा त्यामध्ये सर्वाधिक वाटा आहे. मात्र, राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अभिनय करणार नसल्याचे सांगितले आहे.