Rashmi Mane
मुकेश अंबानी अशी व्यक्ती ज्यांना क्वचितच कोणी ओळखत नसेल.
भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अंबानी कुटुंबीय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात.
सध्या ते चर्चेत आले आहेत, त्यांचे कारण म्हणजे त्यांच्या संपत्तीमध्ये एका दिवसात 22,389 कोटी रुपयांची वाढ झाली. ब्लूमबर्गच्या अब्जाधीश निर्देशांकानुसार ही माहिती समोर आली आहे.
ज्यामुळे ते 100 अब्ज 'डॉलरच्या नेटवर्थ क्लब'मध्ये सामील झाले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जागतिक व्यापार जगतात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
हा क्रमांक गाठण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ॲपलचे टिम कुक आणि टेस्लाचे एलोन मस्क यांना मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे.
यासोबतच मुकेश अंबानी हे 'डायव्हर्सिफाइड' ग्रुपच्या श्रेणीतील टॉप रँकिंग सीईओ बनले आहेत.
R