Sharad Pawar News: एस काँग्रेस-राष्ट्रवादी ते...शरदचंद्र पवार; पवारांचा असा आहे राजकीय प्रवास

Mangesh Mahale

युवक काँग्रेसमध्ये प्रवेश

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून विद्यार्थी संघटनेचे काम करताना शरद पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sharad Pawar | Sarkarnama

पहिल्यांदा आमदार

पहिल्यांदा 1967 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारच्या काळात ते मंत्रीही होते.

Sharad Pawar | Sarkarnama

काँग्रेसचे दोन गट

1977 च्या आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे रेड्डी कॉंग्रेसमध्ये गेले.

Sharad Pawar | Sarkarnama

यशवंतराव मार्गदर्शक

1972 आणि 1978 च्या निवडणुकीत शरद पवार विजयी झाले. यशवंतराव चव्हाण हे त्यांचे मार्गदर्शक होते.

Sharad Pawar | Sarkarnama

वसंतदादांचं सरकार पाडलं...

1978 च्या निवडणुकीनंतर वसंतदादा मुखमंत्री झाले. काँग्रेसचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधकांसोबत हातमिळवणी करून वसंतदादांचे सरकार पाडलं.

Sharad Pawar | Sarkarnama

मुख्यमंत्री

18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.

Sharad Pawar | Sarkarnama

पुलोद

पवारांबरोबर काँग्रेस (आय) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (एस) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने बनली. त्याचे नेते पवार झाले.

Sharad Pawar | Sarkarnama

पुन्हा काँग्रेसमध्ये

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या हाती सत्ता आली. राजीव गांधी यांनी पवारांना काँग्रेसमध्ये येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Sharad Pawar | Sarkarnama

चार वेळा मुख्यमंत्रिपद

1984 मध्ये बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले. ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1988 मध्ये दुसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीची स्थापना

काँग्रेसमध्ये सोनिया गांधी सक्रिय झाल्या. 1999 मध्ये पवारांनी काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा बंड केले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीत फूट

दोन जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट झाले. अजित पवारांनी पक्षावर दावा ठोकला. आयोगाकडून त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार...

7 फेब्रुवारी 2024 रोजी शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव मिळालं.

R

Sharad Pawar | Sarkarnama

NEXT: राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वर्षांचा प्रवास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा