थकलेल्या हातांना मदतीचा वयोश्री योजनेतून आधार, 65 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना मिळते 3 हजारांची मदत; असा करा अर्ज

Aslam Shanedivan

मुख्यमंत्री वयोश्री' योजना

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत 'मुख्यमंत्री वयोश्री' योजना राबवण्यात येत आहे.

Maharashtra Government | Sarkarnama

आर्थिक मदत

ही योजना वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांसाठी असून त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

Senior Citizen | Sarkarnama

सामाजिक न्याय विभाग

सामाजिक न्याय विभागामार्फत या योजनेसाठी 166.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Senior Citizen | Sarkarnama

तीन हजार

65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना उ‌द्भवणाऱ्या शारीरिक समस्यांवर मात करण्यासाठी आणि आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजारांची आर्थिक मदत केली जाते.

Senior Citizen | Sarkarnama

बँक खात्यात पैसे जमा

पात्र ज्येष्ठांना सरकारकडून तीन हजारांची ही आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते.

Senior Citizen | Sarkarnama

'या' योजनेचे उद्दिष्ट

वृद्धावस्थेमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी श्रवणयंत्र, चष्मा, वॉकर, काठी, फोल्डिंग चेअर किंवा व्हीलचेअर आदी खरेदी करता यावीत.

Senior Citizen | Sarkarnama

अर्ज कसा करावा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Senior Citizen | Sarkarnama

महा-ई-सेवा केंद्र

तसेच आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई-सेवा केंद्र) किंवा पालिकेच्या समाजकल्याण विभागात जावून माहिती घेता येईल.

Senior Citizen | Sarkarnama

योजनेसाठी पात्रता

वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आणि तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच गेल्या 3 वर्षात अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Senior Citizen | Sarkarnama

कागदपत्रं कोणती?

वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, फोटो, डॉक्टरांचे प्रमाणपत्र इत्यादी...

Senior Citizen | Sarkarnama

राधाकृष्ण विखे पाटलांची पुतणी बनली खासदार; नीला पाटील यांची परदेशात भरारी...

आणखी पाहा