राधाकृष्ण विखे पाटलांची पुतणी बनली खासदार; नीला पाटील यांची परदेशात भरारी...

Jagdish Patil

नीला विखे पाटील

शिक्षणतज्ज्ञ अशोख विखे पाटील यांची कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांची नात नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झालेय.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

अहमदनगर

नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्या सुरुवातीला अहमदनगर (अहिल्यानगर) येथे रहायच्या.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

स्वीडन

स्वीडिश राजकारणात करिअर करण्याच्या उद्देशाने त्या स्वीडनला गेल्या.

Neela Vikhe Patil

राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी असून त्यांनी स्वीडिश राजकारणात अनेक वर्षे काम केलंय.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

सल्लागार

स्टेफान लोफवन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम केलं आहे.

Neela Vikhe Patil

ग्रीन पार्टी

त्यानंतर त्या स्टॉकहोम सिटी कॉन्सिलवर निवडून आल्या आणि त्यांनी शहरातील ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीवरही काम केलं आहे.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

शिक्षण

त्यांचा जन्म स्वीडनमधील असला तरी प्राथमिक शिक्षण त्यांनी काही काळ नगरमध्ये घेतलं.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

डिग्री

महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी स्वीडन, स्पेन व युरोपात घेतलं. गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र व कायद्याची डिग्री मिळविली.

Neela Vikhe Patil

पार्टी

दी कम्प्ल्युटन्स विद्यापीठातून MBA पूर्ण केलं तर वयाच्या 16 वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.

Neela Vikhe Patil | Sarkarnama

प्रेम

स्वीडनमध्ये राहत असूनही माझं भारतावर प्रचंड प्रेम आहे असं नीला यांनी म्हटलं आहे.

Sweden Parliament | Sarkarnama

NEXT : महिलांसाठी मोठी बातमी! शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू; पात्रता आणि निकष जाणून घ्या

Women Farmer Certificate
क्लिक करा