Akshay Sabale
सरकारने 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
अगोदरच्या अटींप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तत पणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.
म्हणजेच पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेता येत नव्हता.
आता मात्र सरकारने ही अटच काढून टाकली आहे. त्यामुळे आता पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.
पण, सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे.
सरकारने पाच एकर शेतजमिनीची अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.