Rashmi Mane
रक्षाबंधन भावा-बहीणीच्या नात्यातला खास क्षण. नेते मंडळीही कायमच आपली संस्कृती जपताना दिसतात. यातच रक्षाबंधनाच्या सणाला आमदार भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राखी बांधली आहे.
तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहिणीने त्यांना राखी बांधली आहे.
बहिण - भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा, याकरिता राखी पोर्णिमेचा सण साजरा करतात.
साध्वी ऋतंभरा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दिल्लीत राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला.
रक्षाबंधननिमित्त सोलापूर, पुणे, परभणी, अकलूज येथील महिला भगिनींनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांना राखी बांधून आजचा दिवस साजरा केला.
ही राखी विश्वासाची, प्रेमाची असून राज्यातील प्रत्येक माताभगिनींच्या पाठीशी ‘कुटुंबप्रमुख’ भाऊराया सदैव उभा आहे, हा विश्वास उद्धवसाहेबांनी ह्यावेळी व्यक्त केली.
"रक्ताच्या पलीकडलं आम्हा भावाबहिणीचं हे अतूट नातं…. हे नातं बळ देतं ….हिंमत देतं रक्षाबंधनाच्या या मंगलपर्वावर मनःपुर्वक शुभेच्छा प्रसाद दादा" असं म्हणतं चित्रा वाघ यांनी रक्षाबंधन साजरा केला.