सरकारनामा ब्यूरो
भाजप नेत्या मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या.
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचे पुत्र शैलेश टिळक यांच्या पत्नी होत्या.
पुण्यातील भावे हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले.
जर्मन भाषा तसेच मार्केटिंग विषयात एमबीएची पदवी मिळवली.
पत्रकारितेमध्येही शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी केली.
आमदार होण्यापूर्वी सलग चारवेळा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
महापालिकेत अनेक जबाबदारी पेलत असताना त्या पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.
महापौर असताना त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या.
मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हेही भाजपचे सक्रिय नेते आहेत.