सरकारनामा ब्यूरो
शेतकरी कुटुंबात जन्मलेले मुलायम सिंह यादव यांनी विद्यार्थी असताना राजकारणात प्रवेश केला.
त्यांना कुस्तीची आवड होती, 'नेताजी'या नावाने प्रसिद्ध होते. राजकारणात त्यांनी अनेक डावपेच खेळले.
मुलायम सिंह यादव त्यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
राजकीय कारकिर्दीत ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते.
उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले.
1967 मध्ये जसवंतनगर विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 28 व्या वर्षी ते आमदार झाले.
1989 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळात राम मंदिर आंदोलन सुरु होते.
2003 मध्ये ते तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.