एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडून आल्यास काय होते? कोणते सदस्यत्व रद्द होते?

Ganesh Sonawane

एकच प्रभाग

उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडून आला तर तो दोन्ही ठिकाणी सदस्य राहू शकत नाही. त्याने काम करण्यासाठी एकच प्रभाग निवडणे बंधनकारक आहे.

Multiple ward election

सात दिवस

निकाल जाहीर झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत उमेदवाराने कोणत्या प्रभागात काम करणार आहे हे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवणे अनिवार्य आहे.

Multiple ward election | Sarkarnama

लेखी नोटीस

या निवडीसाठी दिलेली लेखी नोटीस स्वतःच्या सहीसह जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष स्वाधीन करणे आवश्यक आहे. पोस्ट किंवा प्रतिनिधीमार्फत सूचना ग्राह्य धरली जात नाही.

Multiple ward election | Sarkarnama

निवड अंतिम

ज्या प्रभागाची निवड उमेदवार करतो ती निवड अंतिम मानली जाते. त्यानंतर प्रभाग बदलणे अथवा दुरुस्ती मान्य होत नाही.

Multiple ward election | Sarkarnama

चिठ्ठ्या टाकून

जर उमेदवाराने ७ दिवसांत कोणताही प्रभाग निवडला नाही, तर जिल्हाधिकारी चिठ्ठ्या टाकून प्रभाग निश्चित करतात — आणि तो निर्णय अंतिम असतो.

Multiple ward election | Sarkarnama

सदस्यत्व रद्द

उमेदवाराने ज्या प्रभागामध्ये काम करण्याची निवड केली नाही, ते इतर सर्व प्रभाग आपोआप रिक्त घोषित केले जातात आणि सदस्यत्व रद्द मानले जाते.

Multiple ward election | Sarkarnama

पुन्हा निवडणूक

रिक्त घोषित झालेल्या प्रभागांसाठी जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास अहवाल पाठवतात व त्या जागांसाठी नवीन निवडणुका जाहीर होतात.

Maharashtra State Election Commission | Sarkarnama

कायदेशीर

ही प्रक्रिया व सर्व नियम महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 — कलम 19(2) व 19(4) अंतर्गत लागू होतात आणि कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहेत.

Maharashtra State Election Commission | Sarkarnama

Next : आमदार-खासदारांशी कसं वागावं? फडणवीसांकडून अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे

येथे क्लिक करा