Mhada Scheme: मुंबईतील तुमचं हक्काच्या घराचं स्वप्नं पूर्ण करण्याची मोठी संधी; काही मिनिटांतच पूर्ण करा प्रोसेस

Deepak Kulkarni

मुंबईत हक्काचं घर

म्हाडाकडून सर्वसामान्यांना मुंबईतील हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

सदनिकांच्या विक्रीची घोषणा

म्हाडाने 120 सदनिकांच्या विक्रीची घोषणा केली आहे. 5 फेब्रुवारी 2026 पासून यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात करता येणार आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

संकेतस्थळ

हक्काच्या घराचं स्वप्नं पाहणाऱ्यांना https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

सदनिका निश्चित करण्याची प्रक्रिया

तुम्हांला म्हाडाच्या या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी भरल्यानंतर प्रत्यक्ष सदनिका निश्चित करण्याची प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होणार आहे. यात ऑनलाइन अर्ज सादर करणं, अनामत रक्कम भरणं यांचा समावेश असणार आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक

घरासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक असणार आहे. तसेच आणि ती व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

जातीचा दाखला

आरक्षण प्रवर्गातून अर्ज असेल तर जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला, आधार कार्ड,पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी असणं आवश्यक असणार आहे.

Mhada Scheme | Sarkarnama

बुक माय होम हे बटन

म्हाडाकडे घरासाठी तुम्ही अनामत रक्कम भरल्यानंतर बुक माय होम हे बटन दिसणार आहे. त्यात इमारत क्रमांक, विंग आणि मजल्या संदर्भात माहिती तुम्हाला मिळेल.

Mhada Scheme | Sarkarnama

48 तासांच्या आत 10 टक्के रक्कम

तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे म्हाडाची सदनिका निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत 10 टक्के रक्कम भरावी लागणार असून जर ती मुदतीत भरण्यात आली नाही, तर तुमचा दावा रद्द होऊ शकतो.तसेच अनामत रक्कमही जप्त केली जाते.

Mhada Scheme | Sarkarnama

हेल्पलाईन क्रमांक

तसेच राहिलेली रक्कम भरण्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून 90 दिवसांचा कालावधी दिला जातो. यात तुमचं जर गृहकर्ज असेल तर बँकेचे प्री-सँक्शन लेटर लॉगिन आयडीवरून अपलोड करणे अनिवार्य असतं. अर्जदारांची फसवणूक टाळण्यासाठी म्हाडाने 9869988000 वर किंवा 022-66405448 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केले आहे.

Mhada-Scheme | Sarkarnama

NEXT: महापौरपद फिक्स होताच मंजुषा नागपुरे थेट अजितदादांच्या कामाच्या पध्दतीवर बोलल्या...

Manjusha Nagpure | Sarkarnama
येथे क्लिक करा...