BMC : मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा! कोणत्या पक्षात किती नगरसेवक? जाणून घ्या...

सरकारनामा ब्यूरो

'मराठी अस्मिता'

ठाकरे बंधूंनी या निवडणुकीत 'मराठी आस्मितेचा' मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. तरीही मुंबई महापालिकेत विविध पक्षांचे 76 अमराठी नगरसेवक निवडून गेले आहेत, तर कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक जाणुन घेऊया.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

भाजप

सर्वात मोठा वाटा अमराठी उमेदवारांना संधी देण्यात भाजपचा आहे. एकूण विजयी उमेदवारांपैकी 33 नगरसेवक अमराठी आहेत. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांच्या जोरावर भाजपने हे यश मिळवल्याचे दिसते.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

काँग्रेस

पारंपारिकपणे अमराठी मतांवर पकड असलेल्या काँग्रेसचे 18 अमराठी उमेदवार विजयी झाले आहेत.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

एमआयएम (MIM)

तर, एमआयएम (MIM) या पक्षानेही आपली ताकद दाखवत 7 अमराठी चेहऱ्यांना महापालिकेत पाठवले आहे.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

शिवसेना (ठाकरे विरुद्ध शिंदे)

मराठी अस्मितेचा मुद्दा मांडणाऱ्या दोन्ही शिवसेना गटांतही अमराठी चेहरे निवडून आले आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे पक्ष) : 8 अमराठी नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष): 4 अमराठी नगरसेवकांचा विजय झाला आहे.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

'मनसे'

संपुर्ण राजकारणाची मदार मराठी केंद्रित असलेल्या राज ठाकरेंच्या 'मनसे' चा देखील 1 अमराठी नगरसेवक महापालिकेत निवडून गेला आहे.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

'राष्ट्रवादी काॅंग्रेस'

इतर पक्षांमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे निवडून आलेले सर्वच्या सर्व नगरसेवक अमराठी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस : 3

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

'सपा'

मुंबईमध्ये नेहमीच मराठी आणि ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्याला विरोध करणाऱ्या समाजवादी पार्टीचे (सपा) : 2 अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

'सर्वसमावेशकता' की 'अतिक्रमण'?

मुंबईचा बदलता चेहरा मराठी नगरसेवकांची संख्या अजूनही मोठी असली, तरी अमराठी प्रतिनिधींचा वाढता टक्का मुंबईच्या राजकारणात 'सर्वसमावेशकता' की 'अतिक्रमण'? हा नवा वादाचा विषय ठरत आहे.

BMC Non-Marathi councillors | Sarkarnama

NEXT : कधी होणार मुंबईच्या महापौरांची निवड? कशी असते निवडीची प्रक्रिया?

BMC Mayor election | Sarkarnama
येथे क्लिक करा.