Ganesh Sonawane
मुंबईत भाजपने ८८ व शिंदेंच्या शिवसेनेने २८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने महापौरही त्यांचाच होणार आहे.
मुंबईच्या महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. किंवा त्याआधी किंवा नंतरही होऊ शकते.
मुंबईच्या महापौरांची निवड ही थेट जनतेतून होत नाही तर त्यासाठी एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते.
महापालिकेवर निवडून आलेले २२७ नगरसेवक आपल्यामधून एकाची महापौर म्हणून निवड करतील.
ज्या पक्षाकडे किंवा युतीकडे ११४ पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांचाच महापौर निवडला जाईल.
सध्या शिवसेना-भाजप युतीकडे हे संख्याबळ असल्याने व भाजपच मोठा पक्ष ठरल्याने भाजपचाच महापौर होईल हे स्पष्टच आहे.
महापालिका आयुक्त लवकरच महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करतील. हे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे की राखीव, हे या सोडतीवरून स्पष्ट होईल.
त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले जातात आणि महापालिकेच्या सभागृहात मतदान होऊन नव्या महापौरांची घोषणा केली जाते.