Jagdish Patil
भाजप आणि ठाकरे बंधुनी प्रतिष्ठेची केलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अखेर भाजप-शिंदेंसेना युतीचा विजय झाला आहे.
भाजपने 89 तर शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला.
भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना 65 जागा मिळवत मुंबईतील दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला. तर मनसेने 6 जागा जिंकल्या.
निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मात्र, भाजपच्या 89 नगरसेवकांमध्ये अनेक दिग्गज चेहरे असून त्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधून आलेल्या काही नेत्यांचाही समावेश आहे.
त्यामुळे आता भाजप कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवाय प्रचारा दरम्यान फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल, असे स्पष्ट केलं होतं.
अशातच आता आता महापौरपदाच्या शर्यतीत ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.
त्यांच्यासह मकरंद नार्वेकर आणि प्रकाश दरेकर या दोघांचीही नाव महापौरपदाच्या शर्यतीत आहेत.
तसंच प्रभाकर शिंदे, प्रीती सातम, उज्ज्वला मोडक, डॉ. प्रज्ञा सामंत, राजेश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर देसाई यांच्या नावाी जोरदार चर्चा सुरू आहे.