Pradeep Pendhare
नगर विकास खात्याकडून गुरूवारी आरक्षणाची सोडत झाल्यानंतर महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.
मुंबई BMC महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीकडे लक्ष लागलं असून, मिळणाऱ्या पगाराची चर्चा आहे.
BMC महापौर अन् नगरसेवकांना कोणताही पगार मिळत नसून, त्यांना मानधन मिळते.
BMC महापौराला महिन्याला 6000 रुपये मानधन मिळते. हे मानधन अतिशय कमी असते.
महापौराचं मानधन कमी असेल, तरी इतर बैठकांचे भत्ते मिळून ते महिन्याला किमान 55 हजार रुपयापर्यंत जाते.
या मानधनाचा वार्षिक हिशोब केल्यास, महापौराला किमान सहा ते साडेसहा लाखापर्यंत जाते.
मानधन कमी असले, तर महापौराला सरकारी निवास, सरकारी वाहन, चालक अन् सुरक्षा व्यवस्था मिळते.
BMC मधील नगरसेवकांना महिन्याला किमा 25 हजार रुपयांचे मानधन मिळते.