Ajinkya Naik : शरद पवार अन् फडणवीसांचा वरदहस्त, बड्या नेत्यांना घ्यावी लागली माघार'; कोण आहे हा पॉवरफुल व्यक्ती?

Rajanand More

MCA निवडणूक

क्रिकेट जगतात मुंबई क्रिकेट असोसिएशनला खूप महत्व आहे. त्यामुळेच या असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळते.

MCA Election | Sarkarnama

शरद पवार

शरद पवार, विलासराव देशमुख, आशिष शेलार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी असोसिएशनेच अध्यक्षपद भुषविले आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

अजिंक्य नाईक

याच असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक या ३८ वर्षीय तरूणाची यंदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासाठी जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर या मातब्बर नेत्यांनी माघार घेतली.

Ajinkya Naik | Sarkarnama

वरदहस्त

अजिंक्य यांच्यावर पवार व फडणवीसांचा वरदहस्त राहिला आहे. सलग दुसऱ्या निवडणुकीत या दोघांनी आपले वजन त्यांच्या पारड्यात टाकले आहे.

Ajinkya Naik | Sarkarnama

अचानक संधी

अमोल काळे यांच्या निधनानंतर अजिंक्य यांना २०२४ मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी १०७ मतांनी दणदणीत विजय मिळवला होता.

Ajinkya Naik | Sarkarnama

कारकीर्द

2015 पासून ते असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. 2019 ते 2022 या काळात ते कार्यकारिणी सदस्य, 2022 ते 2024 दरम्यान सचिव म्हणून काम पाहिले.

Ajinkya Naik | Sarkarnama

सर्वात तरूण अध्यक्ष

असोसिएशनच्या इतिहासातील सर्वात तरूण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांनी आपले नाव कोरले आहे. अंतर्गत येणाऱ्या अनेक क्लबवर नाईक यांचा वरचष्मा असल्याचे मानले जाते.

Ajinkya Naik | Sarkarnama

राजकीय कनेक्शन

अजिंक्य नाईक हे सध्यातरी राजकारणात कोणत्याही पक्षात सक्रीय नाहीत. मात्र, त्यानंतरही असोसिएशनमध्ये त्यांना बड्या नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MCA Election | Sarkarnama

NEXT : पहिल्या महिला DGP भाजपच्या तिकीटावर लढविणार महापालिका निवडणूक; उमेदवारी जाहीर

येथे क्लिक करा.