Ganesh Sonawane
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून हवामान खात्याने शहरात 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दुर्दैवाने जिवीतहानीच्या घटना घडल्या आहेत.
आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता आहे," असे म्हणत महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काम नसेल तर घराबाहेर पडू नका. आपले कुटुंब सुरक्षित ठेवणे ही पहिली प्राथमिकता आहे.
जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि त्यांच्या मोठ्या फांद्या उन्मळून पडण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना किंवा उभे राहताना झाडांखाली थांबणे टाळा.
झाडे किंवा कमकुवत भिंतींच्या शेजारी आपली वाहने पार्क करू नका. वाहने मोकळ्या आणि सुरक्षित जागेवर उभी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही जुन्या किंवा खोट्या व्हिडिओ आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत प्रशासकीय माहितीचाच आधार घ्या.