Rajesh Shah : वरळी 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात चर्चेत आलेले राजेश शाह कोण?

Akshay Sabale

जामीन मंजूर -

वरळी 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांना अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानिमित्त राजेश शाह कोण जाणून घेऊया...

rajesh shah | sarkarnama

शिंदेंचे निकटवर्तीय -

राजेश शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेतील बंडानंतर शाहांनी शिंदेंना साथ दिली.

rajesh shah | sarkarnama

संपर्क -

शाह त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेटवर्किंगसाठी ओळखे जातात. पालघर आणि आसपासच्या भागात त्यांचा चांगला संपर्क आहे.

rajesh shah | sarkarnama

उपनेते -

एप्रिल 2023 मध्ये शिंदेंनी शाहांची उपनेतेपदी नियुक्ती केली. त्याआधी ते पालघर जिल्हाप्रमुख होते. त्यावेळी शिवसेना एकसंध होती.

rajesh shah | sarkarnama

व्यवसाय -

पालघरमधील एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भंगार व्यवसायावर त्यांचं वर्चस्व आहे. याशिवाय ते बांधकाम साहित्यदेखील पुरवतात.

rajesh shah | sarkarnama

राजकारणात सक्रिय -

शाह 2000 सालाच्या आधीपासून राजकारणात सक्रिय होते. ठाणे आणि आसपासच्या भागात ते काम करत होते.

rajesh shah | sarkarnama

शिंदेंचा उजवा हात -

ठाकरेंनी शिंदेंकडे ठाणे आणि पालघरची जबाबदारी सोपवली. त्यानंतर शाह आणि शिंदे एकमेकांच्या अधिक जवळ आले. पालघरमधील शिंदेंचा उजवा हात अशी शहांची ओळख आहे.

rajesh shah | sarkarnama

NEXT : राजन पाटलांनी उमेदवारी जाहीर केलेले यशवंत माने कोण आहेत?

Yashwant Mane | Sarkarnama