Rashmi Mane
'हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है…'
ही ओळ IPS ईश्वरलाल गुर्जर यांनी खरी ठरवली आहे. कधीकाळी 10वीत नापास झालेले आज तीनदा UPSC क्रॅक करणारे अधिकारी आहेत.
ईश्वरलाल 10वीत नापास झाले होते, गुण कमी आल्यामुळे शिक्षण सोडावं असंही त्यांना वाटलं होतं. पण वडिलांचा सल्ला आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला.
वडील सुवालाल म्हणाले – "शिक्षणाचं महत्त्व तुला आता कळणार नाही, पण भविष्यात नक्की कळेल." हीच वाक्यं ईश्वरलालांच्या जिद्दीची नवी सुरुवात ठरली.
ईश्वरला यांनी पुन्हा 10वी पास केली (54%). 12वीत 68% मिळवून महर्षी दयानंद विद्यापीठ, अजमेर येथून पदवी पूर्ण केली.
राजस्थान वनरक्षक भरती, पटवारी भरती, जेल प्रहरी भरती, RAS मेन्स भरती, UPSC प्रिलिम्स/इंटरव्ह्यू (2019-21) – सलग 6 अपयशं! तरीही हार मानली नाही.
त्यानंतर अपयशावर मात करत त्यांनी 2019 मध्ये रीट पास होऊन थर्ड ग्रेड टीचर बनले. त्यानंतर 2021 मध्ये राजस्थान पोलीस सब-इन्स्पेक्टर परिक्षा पास झाले आणि त्यानंतर RAS क्रॅक करून SDM झाले.
2022 : AIR-644 – IRS अधिकारी
2023 : AIR-555 – IPS अधिकारी
2024 : AIR-483 – पुन्हा UPSC मध्ये यश!
मराठीतून शिकूनही त्यांनी तीन वेळा UPSC क्लियर केली.
अपयशानंतरही थांबले नाहीत. 10वी नापास झालेला विद्यार्थी आज देशसेवेत IPS अधिकारी आहे. त्यांनी जिद्द आणि चिकाटीने सर्वकाही शक्य आहे हे दाखवून दिलं.