Jagdish Patil
BMC च्या महापौर रितू तावडे यांनी गोरगरीबांना 50 हजारांपर्यंत आर्थिक मदतीसाठी महापौर वैद्यकीय निधीमध्ये वाढ करण्याचा निर्धार केला आहे.
वैद्यकीय निधीत वाढ करण्याचा निर्धार करणाऱ्या त्या चौथ्या महापौर ठरल्या.
वैद्यकीय निधीतून मुंबईतील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी 5 ते 25 हजारांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
याआधी 5 हजारांची मदत दिली जायची. पण दिवंगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यांनी ती 25 हजारांपर्यंत वाढवली.
कर्करोग, किडणी, हृदयरोग तसेच डायलिसिसच्या उपचारांकरिता महापौर वैद्यकीय निधी दिला जातो.
महापौर वैद्यकीय निधी कमी असल्यामुळे तावडेंनी त्यामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याचा निर्धार केला आहे.
यासाठी त्यांनी आपले मानधन दिले असून भविष्यात दानशूर व्यक्तींना मदतीचं आवाहन केलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या.
निधी वाढीमुळे रुग्णांना 50 हजारपर्यंत मदत मिळेल. या निधीसाठी नगरसेवकांनीही एक महिन्याचे मानधन देण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे वैद्यकीय निधीमध्ये 59 लाख 25 हजार रुपयांची भर पडणार आहे.
याआधी दत्ता दळवी, विश्वनाथ महाडेश्वर आणि किशोरी पेडणेकरांनी यांनी या निधीमध्ये वाढीसाठी प्रयत्न केले होते.