Deepak Kulkarni
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' हा १३.३० किमी लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो १ मे २०२६ रोजी लोकरणात आला आहे.
या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ६ किमीने आणि प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होतो.
मिसिंग लिंकवर सुरक्षित वाहतुकीसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवीन नियम लागू होणार आहेत.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर १ नोव्हेंबरपासून मालवाहू वाहनांना पूर्णबंदी घालण्यात आली असून कारसाठी १०० किमी वेगमर्यादा निश्चित केली आहे.
या रोडवर खासगी कार, जीप आणि हलक्या मोटार वाहनांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी असणार आहे.
पिकअप व्हॅन आणि टाटा एस यांसारख्या हलक्या वाहनांसह तसेच धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांसह आता सर्वच प्रकारच्या लहान-मोठ्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
मिसिंग लिंकवर बंदी घातलेल्या वाहनांना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या मूळ जुन्या हायवेचा वापर करावा लागणार आहे.
या निर्णयामागं बोगद्यातील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारण देण्यात येत आहे.
राज्याच्या अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभागानं 26 ऑक्टोबर रोजी याविषयीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.