Pradeep Pendhare
आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेचा 2026-27 वर्षासाठीचा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
महसूल वाढीसाठी मुंबई महापालिका वन टाईम प्रिमियम पॉलिसी राबवताना, एफएसआय, टिडीआर, फंजिबल एफएसआय यापोटी घेतल्या जाणाऱ्या एक वेळ अधिमूल्यात वाढवलं जाणार
40x40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी; पदपथ व गच्चीवरील जाहिरातींनाही सक्त मनाईचा निर्णय
मुंबईत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 1000 कोटींच्या ग्रीन बॉन्डसची निर्मिती करून, त्यासाठी केंद्राकडून 100 कोटींचे अनुदान मिळणार
मिठी नदीसाठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणच्या आराखड्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 286.25 कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेकडून बेस्ट साठी 1000 कोटी, तर मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि किनारी रस्त्यासाठी 4700 कोटीची तरतूद
मुंबईतील जवळपास एकूण 101 पुलाची कामांबरोबरच कोस्टल रोडसाठी एकूण 4 हजार कोटी, तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 2 हजार 650 कोटीची तरतूद
मुंबईतील विविध महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटी, तर आरोग्य खात्यासाठी 7 हजार 456 कोटीची आणि पाणीपुरवठा यंत्रणांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.
स्मार्ट वाहनतळ प्रकल्प उभारताना ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट वाहनतळ PPP तत्वावर उभारणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 6875 कोटी रुपये तरतूद आहे.
करमणूक कर लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. पर्यावरण आणि स्वच्छता अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याला 159.81 कोटी तरतूद
मुंबईच्या ट्रॅफिकची कोंडीवर मार्ग काढण्यासाठी मल्टी-मॉडेल टनेल कनेक्टिव्हिटीसाठी 4392 कोटींचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली असताच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.