Rashmi Mane
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज मुंबईतील जुहू चौपाटीवर जाऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
एकनाथ शिंदे यांनी बिच क्लीनिंग मशीन स्वतः हातात घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साथीने स्वच्छता माेहिमेत सहभाग घेतला.
या वेळी ट्रॅक्टरचं स्टेरिंग मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घेतलं.
या वेळी जुहू बीचवर नियमितपणे करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती घेतली.
सध्या मुंबईतील समुद्र किनारी ऑटोमॅटिक मशीनमधून कचरा उचलला जातो. यामुळे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मदत मिळेल.
या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दीपक सावंत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि मुंबई मनपाचे इतर सर्व प्रमुख अधिकारी तसेच स्वच्छता कर्मचारीही उपस्थित होते.
मोहिमेदरम्यान सीएम शिंदे जुहू बीचवर ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.