PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' राज्यांमध्ये जमा; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे?

Rashmi Mane

पीएम किसान योजना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आजपासून पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते.

PM Kisan Yojana | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी पैसे जमा

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 8.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले आहेत.

PM Kisan Yojana | Sarkarnama

20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

PM Kisan 2025 | Sarkarnama

तत्काळ आर्थिक मदत

आता 21वा हप्ता अॅडव्हान्समध्ये जारी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यात येत आहे. या हप्त्याचे वितरण विशेषत: पूरग्रस्त आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

इतर राज्यांतील शेतकऱ्यांनाही लवकरच

आधीच हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नजरा आपल्या बँक खात्याकडे लागल्या आहेत.

PM Kisan Yojana | Sarkarnama

पैसे आले की, चेक करा

पीएम किसान योजनेत पैसे आले की, ते शेतकरी घरबसल्या ऑनलाइन चेक करू शकतात. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांना मेसेजद्वारे कळवले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे लगेच माहिती मिळेल.

PM Kisan 2025 | Sarkarnama

Next : 2 रनवे, 4 टर्मिनल, कुठूनही चेकिंग अन् कमळाच्या डिझाईन : नवी मुंबई विमानतळाची 5 वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा