Jagdish Patil
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (ता.३) आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी झाला.
या टँकरमधून गॅस लिकेज झाल्यामुळे महामार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.
यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली ज्यामुळे तब्बल 40-50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरल्यानंतर तो क्रेनच्या सहाय्यानं बाजूला केला.
त्यामुळे 32 तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अचानक उद्धभवलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.
काही लोकांना विमानतळावर तर काहींना दवाखान्यात जायचं होतं. मात्र या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचे प्लॅन फिस्कटले.
यावेळी प्रवाशांकडे असलेले पिण्याचे पाणी संपले शिवाय आसपास दुकाने नसल्यामुळे लोकांना पाणी देखील मिळालं नाही.
जवळचा प्रवास असलेल्या लोकांनी सोबत जेवण आणलं नव्हतं आणि वाहणं एकाच जागी थांबल्याने त्यांना उपाशी रहावं लागलं.
तर लहान मुलांना आणि महिलांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
एकंदरीतच या सर्व परिस्थिमुळे लोक सोशल मीडियावर प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.