मिसिंग लिंकवर अपघाताचा धोका, प्रवास करताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष असूद्या...

Rajanand More

मिसिंग लिंक

यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी लोकापर्ण करण्यात आले. त्याच दिवशी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

वेगवान

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास वेगवान झाला आहे. प्रवासातील २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचत असून इंधन बचतही होत आहे.

Mumbai Missing Link | Sarkarnama

बेशिस्त

वाहतुकीसाठी मार्ग खुला करताच काही वाहनचालक सेल्फी/फोटो काढण्यासाठी केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत आहेत.  

Missing Link | Sarkarnama

अपघाताचा धोका

द्रुतगती मार्गावर वाहन थांबवण्यास परवानगी नाही; त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Missing Link | Sarkarnama

वेगमर्यादा पाळा

बोगद्यात वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून हलक्या वाहनांसाठी ती 100 किमी/ताशी तर बस/प्रवासी वाहनांसाठी 80 किमी/ताशी एवढी आहे.

Missing Link | Sarkarnama

देखरेख 

संपूर्ण मार्गावर (बोगदे व पूल) 24x7 CCTV देखरेख ठेवण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही संपूर्ण मार्गावर असणार आहे. 

Missing Link Features Explained | sarkarnama

दंडात्मक कारवाई 

सेल्फी/फोटोसाठी वाहन थांबवल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway 'Missing Link' | Sarkarnama

नियम पाळा

वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Missing Link | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील सात आश्चर्ये माहिती आहेत का? वाचा एका क्लिकवर...

येथे क्लिक करा.