Aslam Shanedivan
शिमग्यासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणी माणसासाठी आनंदाची बातमी असून शिमग्याआधी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे.
शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता आता बोटीने जाता येणार असून मुंबईवरून अवघ्या ७ तासांमध्ये विजयदुर्गला पोहचता येणार आहे
१ मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात विजयदुर्गला जाता येणार असल्याने कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोकणामध्ये शिमग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एम टू एम फेरीचे वेळापत्रक मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईतल्या भाऊचा धक्क्यावरून विजयदुर्गपर्यंत एम टू एम फेरीने प्रवास करता येणार आहे. नितेश राणेही पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार आहेत.
१ मार्च आणि २ मार्च
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल. तर विजयदुर्ग येथून दुसऱ्या दिवशी (ता.२) दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल. आणि ५ मार्च रोजी विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल. तर ८ मार्च रोजी विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
Neal Katyal : टॅरिफ रद्द! डोनाल्ड ट्रम्प यांना भिडणारे नील कत्याल कोण? भारताशी आहे खास कनेक्शन