Rashmi Mane
तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही तुमच्या पगारातील घरभाडे भत्ता म्हणजेच HRA यावर कर सवलत मिळवू शकता. मात्र, एप्रिल 2026 पासून आयकर नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्यामुळे या सवलतीबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
पण HRA म्हणजे काय? घरभाडे भत्ता (HRA) हा पगारातील एक महत्त्वाचा भाग आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना घरभाडे भरण्यासाठी कंपनीकडून दिली जाणारी ही रक्कम असते. योग्य पद्धतीने वापरल्यास यावर कर सवलत मिळू शकते.
HRA सवलत फक्त पगारदार कर्मचाऱ्यांनाच मिळते. त्यासाठी भाड्याच्या घरात राहणे आणि प्रत्यक्ष भाडे भरणे आवश्यक आहे. स्वतःच्या घरात राहिल्यास ही सवलत मिळत नाही.
मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये पगाराच्या ५०% पर्यंत सवलत मिळू शकते. इतर शहरांसाठी ही मर्यादा ४०% आहे. त्यामुळे शहरानुसार फायदा बदलतो.
कर सवलत खालीलपैकी कमी रकमेवर ठरते:
• मिळालेला HRA
• पगाराच्या ५०%/४०%
• भाडे – पगाराच्या १०% वजा करून
ही सवलत फक्त जुन्या कर प्रणालीत (Old Tax Regime) लागू आहे. नवीन कर प्रणाली निवडल्यास HRA सवलत मिळत नाही.
HRA क्लेम करण्यासाठी भाड्याच्या पावत्या, रेंट अॅग्रीमेंट, फॉर्म 12BB आणि बँक व्यवहारांचा पुरावा आवश्यक आहे. जास्त भाड्यासाठी घरमालकाचा PANही द्यावा लागतो.
घरमालक नातेवाईक असल्यास त्याची माहिती द्यावी लागते. योग्य कर प्रणाली निवडणे महत्त्वाचे आहे. निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो.